हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. अशावेळी स्किनला खाज येते. त्यामुळे त्वचेवरील आद्रता आणणे आवश्यक असते.
त्वचा मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करावा.
नियमित हात पाय आणि पूर्ण बॉडीवर मॉईशरायझर वापरावे
या दिवसात जास्त मेकअप करू नये
खाज सुटत असेल तरी खाजवू नये आणि त्यावर लगेच कोल्ड क्रीम लावावे.
अंघोळीच्या आधी खोबरेल तेलाने किंवा तीळ तेलाने मसाज करावा.
अंघोळ करताना ग्लिसरीन टाकावे
हिवाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी दुधाची साय आणि बेसन पीठ एकत्र करून लावावे आणि १० मिनिटात धुवावे.
थंडीमध्ये कुठलाही फेसपॅक लावल्यास पूर्ण सुकण्याच्या आधीच धुवून टाकावा. नाहीतर स्किन जास्त ड्राय होऊ शकते.
संत्रा साल वाळवून त्याची पेस्ट बनवावी . त्यात मध टाकून ते लावावे.
मुळ्याचा रस आणि सफरचंदाचा गर याची पेस्ट लावल्यास त्वचा जास्त उजळते.
थंडीत शक्यतो साबण वापरू नये त्या ऐवजी उटणे + तीळ तेल लावावे
किंवा मुलतानी माती + दूध लावावे.
बदाम , गुलाबाच्या पाकळ्या आणि दुधाची साय एकत्र करून लावावी. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या अनेकदा उदभवते अशावेळी
घरचे तूप आणि मीठ समप्रमाणात घेऊन लावल्यास आराम पडतो.
रात्री झोपताना २ मिनिटे घरच्या तुपाने ओठांवर हळुवार मसाज करावा.
दुधाची साय ओठांवर लावून १० मिनिटांनी धुवून टाकावे.
0 टिप्पण्या