मेहेंदी
मेहेंदी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनातील सुखद कोपरा असतो.
मेहेंदी आपण सणामध्ये आणि लग्नात लावतो. आपलीच मेहेंदी सर्वात जास्त रंगावी असे वाटते. काही वेळेस तसे झाले नाही तर आपले मन नाराज होते
तसे होऊ नये यासाठी काही खबरदारी घ्यावी म्हणजेच मेहेंदी कशी भिजवावी त्यात काय काय टाकावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आज आपण मेहेंदीची माहिती घेऊयात
मेहेंदी पावडर मेहेन्दीच्या झाडाला असलेल्या पानांना सुकवून त्याची पावडर करतात. नंतर बारीक चाळणीने चाळून ती वापरतात. मेहेंदीची झाडे जास्तकरून उष्ण प्रदेश असलेल्या भागात असतात.
मेहेंदी कशी तयार करावी
मेहेंदी छान रंगण्यासाठीं पुढील पद्धत वापरावी
प्रथम १ चमचा चहा पावडर आणि ४ लवंग घेऊन ते साध्या पाण्यात ५ मिनिटे उकळावे. गाळून थंड करावे
थंड झालेल्या मिश्रणात १० थेंब निलगिरी ( कुठल्याही मेडिकल मध्ये भेटते ) आणि १ चमचा लिंबू रस टाकावा.
आता त्यात मेहेंदी पावडर बारीक चाळणीने चाळून टाकावी आणि व्यवस्थित फेटून घ्यावे.
भिजवलेली मेहेंदी २ तास बाजूला ठेऊन द्यावी.
एक जाड प्लॅस्टिकची चौकोनी पिशवी घ्यावी , किंवा तशी पिशवी नसेल तर दुधाची पिशवी व्यवस्थित धुवून घ्यावी
पिशवीला आईस क्रिम कोनप्रमाणे मुडपून घ्यावी
आणि चिकटपट्टीने चिटकवून घ्यावी. ज्या साईडने कोनमध्ये आईस्क्रीम असते त्या बाजूने हळुवार छोट्या चमच्याने मेहेंदी भरावी
आता सामोसा ज्याप्रमाणे सारण भरून बंद केला जातो त्याप्रमाणे मुडपून चिकटवावे.
0 टिप्पण्या