Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

ब्रायडल मेकओव्हर | Bridal Make - over Part 1

 ब्रायडल मेकओव्हर 

                                                                            Part 1


            लग्न म्हटले कि लग्न जमल्यापासून ते होईपर्यंत गडबड घाई असते. या घाई गडबडीचा रुटीनमध्ये नवरीला स्वतःकडे लक्ष देणे जमत नाही आणि याचा दुष्परिणाम असा होतो कि , एन लग्नाच्या वेळी नवरी निस्तेज दिसू लागते. असे होऊ नये यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. ते कोणती हे आपण आज पाहुयात... 


लग्नामध्ये बरेच विधी असतात. जसे कि हळद, साखरपुडा , मेहेंदी या सर्वासाठी मेकअप आणि हेअरस्टाईल आधीच ठरवून ठेवावे . 

विधींच्या तारखेच्या काही दिवस आधी ड्रेपरी मेकअप आणि हेअरस्टाईल करून बघावी म्हणजे आपल्याला काय सूट होते काय नाही हे लक्षात येते. 

म्हणजे  त्यात काही बदल करायचा असल्यास करता येतो. 

खरेदीसाठी बाहेर गेल्यावर हॉटेलमधील पदार्थ खाणे टाळावे. ते जास्त तेलकट असतात आणि अनहायजेनिक असू शकतात त्यामुळे तुम्ही एन लग्नाच्या वेळी आजारी पडू शकता. 

जास्त उन्हात फिरू नये त्याने आपली स्किन टॅन होऊ शकते 

बाहेर जाताना नेहमी पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. किंवा चांगल्या प्रतीच्या कंपनीची पाणी बॉटल घ्यावी. ज्यामुळे तुमच्या तब्येतीवर काही विपरीत परिणाम होणार नाही . 

वेळेवर जेवण , पाणी आणि झोप घेणे हे फारच महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या लग्नात सुंदर दिसायचे आहे तर तुम्ही निरोगी असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे करणे प्राथमिक आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या