प्राणायामाचे नियम आणि फायदे
आजकालच्या प्रदूषणाच्या काळात प्रत्येकाने स्वतःला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे.
आज आपण प्राणायामाचे नियम आणि फायदे माहित करून घेणार आहोत
प्राणायामाचे नियम
प्राणायाम करताना वेळेचे फार महत्व आहे सकाळी सूर्योदय झाल्यावर किंवा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी करावा
प्राणायाम करताना मन एकाग्र होण्यासाठी प्रथम ओंकार गुंजन करावे
प्राणायाम करण्यापूर्वी कमीतकमी २ तास आणि नंतर १ तास काही खाऊ नये
प्राणायाम करताना डोळे बंद ठेवावे म्हणजे मन एकाग्र होते.
प्राणायाम करताना किंवा नंतर दिवसभरात काही त्रास होत असल्यास थोड्या दिवस प्राणायाम करू नये
प्राणायाम सुरुवात करताना प्रथम संख्या कमी असावी जसे कि ३ वेळा नंतर ५ वेळा असे करून वाढवावी.
प्राणायाम करताना डोळे बंद ठेऊन दोन भुवयांच्या मध्ये चित्त एकाग्र करावे.
प्राणायाम योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे
प्राणायाम नेहमी जमिनीवर बसून करावे
प्राणायामाचे फायदे
प्राणायाम सर्व प्रकारच्या व्याधींना दूर करतो
प्राणायामाने मन शुद्ध होते
दिवसभर प्रसन्न वाटते.
उत्साह राहतो.
रक्ताभिसरण संतुलित राहते.
0 टिप्पण्या