झोका
सुताचा दोर झाडाला टांगला
बाळूचा झोका तयार झाला
झोक्यावर बाळू घेतो झूल
क्षणात वाऱ्याला देतो हूल
बाळूचा झोका मागे पुढे
बाळूच्या अंगावर फुलांचे सडे
बाळूला झोका देते ताई
दुरून बघतात बाबा आई
झोक्यावर बाळू दिसतो कसा
निळ्या आभाळी चांदोबा जसा
सुताचा दोर झाडाला टांगला
बाळूचा झोका तयार झाला
झोक्यावर बाळू घेतो झूल
क्षणात वाऱ्याला देतो हूल
बाळूचा झोका मागे पुढे
बाळूच्या अंगावर फुलांचे सडे
बाळूला झोका देते ताई
दुरून बघतात बाबा आई
झोक्यावर बाळू दिसतो कसा
निळ्या आभाळी चांदोबा जसा
0 टिप्पण्या