वारांचे गाणे
गाणी , गप्पा- गोष्टींचा,
सोमवार आमच्या आवडीचा .
कृतीतून परिसर शिकण्याचा,
मंगळवार असे निरीक्षणाचा .
कागद,माती, विविध रंग,
बुधवारी आम्ही त्यातच दंग .
भाषणासाठी जितू उभा,
गुरुवारी जमली बालसभा
पाने,फुले,जंगल सफारी,
सहलीला जाऊ शुक्रवारी.
खेळण्यात आनंद वाटे भारी,
कवायत आमची शनिवारी.
शाळेला सुटटी रविवारी,
मित्र येती खेळायला घरी.
0 टिप्पण्या