पुरणपोळी आणि कटाची आमटी
कोर्स: लंच । डिनर
पाककृती: भारतीय
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य :-
हरभरा डाळ २ वाटी
गूळ ३ वाटी
विलायची १०
सुंठ १
काळी मिरी ५ ते ६
साजूक तूप १ वाटी
गहू पीठ २ वाट्या
मैदा १ वाटी
तांदूळ पीठ १ वाटी
सुके खोबरे १ वाटी
कांदा २
लसूण ( १ वाटी सोलून )
आले एक चमचा खिसुन
कडीपत्ता
१ चमचा जिरे
१ चमचा मोहरी
१/२ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
१/४ चमचा लाल तिखट
१/४ चमचा मीठ
१/४ चमचा तेल
१ चमचा कांदा लसूण मसाला
कृती :-
हरभरा डाळ निवडून , धुवून २ मिनिटे भिजत ठेवावी
त्यात १/२ चमचा मीठ आणि १/२ चमचा तेल टाकून नंतर कुकरला ५ शिट्टी करून शिजून घ्यावी
गहू पीठ आणि मैदा बारीक चाळणीने चालून घ्यावे
त्यात १/२ चमचा मीठ , १ चमचा तेल टाकून एकजीव करावे
त्यात पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यावे
१५ अर्धा तास झाकून ठेवावे
सुंठ,विलायची, काळीमिरी एकत्र कुटून बारीक करावी
सुके खोबरे , कांदा , १/२ वाटी लसूण,आले थोड्या तेलावर खरपूस भाजून घ्यावे आणि बारीक वाटून पेस्ट करावी.
कुकर उघडून डाळ शिजली आहे का ते पाहावे . एक पातेले घ्यावे त्यावर चाळणी ठेऊन कूकरमधील डाळ चाळणीत ओतावी त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे
निथळलेले पाणी फेकून देऊ नये ते आमटीमध्ये ओतावे.
आता कढईमधे डाळ टाकावी आणि त्यात २ वाटी गूळ टाकून छान परतावे
आधी गूळ विरघरल्यामुळे मिश्रण सैल होईल , जसे जसे परतणार तसे दाट किंवा घट्ट होईल पूर्ण परतताना कलथा वापरावा ,
कलथा पुराणामध्ये उभा राहिला तर समजावे पूर्ण परतले आहे ,
सुंठ,विलायची, काळीमिरी वाटलेले वाटण त्यात टाकावे आणि मिक्स करून घ्यावे
गॅस लगेच बंद करावा
परतलेले पुरण बारीक वाटून घ्यावे.
मळलेले पीठ पोळपाटावर ठेऊन लाटणे घेऊन पाच सहा वेळा त्यावर मारावे ( कपडे धुताना धोपटान्याने धोपटतो त्याप्रमाणे )
असे केल्याने पीठ एकजीव होते गुठळ्या असतील तर निघतील
आता त्यातील लिंबाच्या आकाराचा गोळा करून त्याला वाटीप्रमाणे आकार द्यावा त्यात पुरणाचे सारण भरून वाटी बंद करावी त्याला सुके तांदळाचे पीठ लावून हळुवार पोळी लाटावी
तवा तापवून घ्यावा त्यावर तेल पसरवून पोळी खरपूस भाजून घ्यावी.
गॅसवर कढई ठेऊन तेल गरम करून घ्यावे जिरे फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकावा,
हळद , लाल तिखट , कांदा लसूण मसाला टाकून परतावे मग त्यात कांदा खोबरे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
त्यात डाळीचे पाणी आणि थोडी डाळ (वेळवणी )ओतावी.
चवीप्रमाणे मीठ टाकावे .
मंद आचेवर आमटी उकळून घावी.
आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे
सर्व करताना त्यासोबत गुळवणी , भात आणि कुरडई पापड असावी.
0 टिप्पण्या