Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुलभभारती मराठी \ इयत्ता चॊथी \ कविता प्रश्न / Grade 4 MARATHI POEM

 सुलभभारती मराठी 

 इयत्ता चॊथी  

 कविता    प्रश्न 


पशुपक्ष्यांना असते अवगत 

जगण्याची हि कला,

माणसाला का जमत नाही  ?

प्रश्न पडतो  मला 


चिमणी कधी म्हणत नाही 

हवा मोरासारखा पिसारा,

गाय काळजी करत नाही 

मिळेल का मला चार  ?


कोकीळ कधी म्हणत नाही

काळा का माझा रंग  ?

तो तर आनंदाने 

गाण्यात असतो दंग  ! 


बैल कधी म्हणत नाही 

मीच का राबू ?

कावळा कधी विचारतो का 

वापरू कोणता साबू  ?


ससा कधी म्हणत नाही 

मीच का  भित्रा  ?

वाघोबाचा शूरपणा 

मागत नाही कुत्रा . 


जो तो जगतो आनंदाने 

नाही कसली चिंता,

माणसाच्याच मनात असतो 

विचारांचा गुंता . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या