सुलभभारती मराठी
इयत्ता चॊथी कविता
खेळातील स्वयंपाक
पिठामध्ये पाणी घालतो,
तिंबून तिंबून कणिक ,
भरभर भरभर पोळी लाटतो .
पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो,
गरमगरम पोळी वाढतो.
विळीवरती वांगी चिरतो,
गरम मसाला त्यात भरतो.
कढईत तेल ,मोहरी फुटता,
तिखट घालून रस्सा करतो.
डाळ,तांदूळ डब्यात भरतो,
पाण्याची वर धार धरतो.
कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो,
स्वयंपाक झाला, जाहीर करतो.
स्वयंपाक माझा डबीत मावतो,
तरीही आम्ही पोटभर जेवतो.
पचनासाठी दोन फळे,
देऊन ठेवतो.
0 टिप्पण्या