सुलभभारती मराठी
इयत्ता चॊथी कविता
आगगाडी
झुकझुक गाडी
घरांची माळ,
चालती फिरती
अजब चाळ !
धावत जाते
गावोगाव,
हुंदडत फिरते
गावानंगाव.
पाऊस , वाऱ्याची
नसे भीती,
वाटेत वादळ
असो किती !
तिला न अडवी
नदी, पहाड,
टाटा म्हणते
झाडनझाड .
छंद म्हणा की
उदयोग खरा,
सर्वांना पोचवी
घरा घरा !
0 टिप्पण्या