केस गळण्यावर घरगुती उपाय
केस गळत असतील तर
- खूप गरम पाणी केस धुताना वापरू नये.
- केस ओले असताना विंचरू नये त्याने केसांची मुळे कमकुवत होतात , परिणामी केस तुटतात.
- आठवड्यातून किमान दोन वेळा कोमट तेलाने केसांना हळुवार मसाज करावा.
- जास्वंदीचे फुल आणि कोरफडीचा गर खोबरेल तेलात उकळवून , कोमट झाल्यावर केसांना लावावे
- खोबरेल तेलात कढीपत्ता , कांद्याची साल टाकून उकळवून कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी लावावे याने केस गळने थांबते. असे जास्तीचे तेल तयार करून महिनाभर वापरू शकता.
- मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे, सकाळी बारीक पेस्ट तयार करावी केसांना १ तास लावून नंतर पाण्याने धुऊन टाकावे
- केस रोज कंगव्याने हळुवार विचारावे असे केल्याने केसांना ऑक्सिजन भेटतो आणि ते चमकदार होतात
0 टिप्पण्या