Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

मराठी कविता \ इयत्ता तिसरी \ मराठी सुलभभारती \ ससोबा \ Marathi Poem Grade 3 - marathi Sulabhbharti


ससोबा  


ससा रे ससा. 

असा रे कसा ?


ताठ असती तुझे कान . 

तोंडावरती मिश्या छान. 


डोळे तुझे लाल लाल. 

गुबगुबीत तुझे गाल. 


अंग तुझे पांढरे पांढरे,

दिसे किती छान गोजिरे . 


शेपटी तुझी इवलीशी,

हलवतोस अशी कशी  ?


गवत खातो कुरूकुरू. 

चालतोस तू तुरुतुरु. 


चाहूल लागता थोडीशी,

मारतोस तू दडी कशी  ?


असा रे कसा,

भित्रा तू ससा ?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या