संत श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर
जुन्नर तालुक्यातील ''आळे'' या गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी "वेद" म्हणवून घेतले होते त्या रेड्याची समाधी आहे
आळे हे गाव पुणे नाशिक हायवे वरून ३ किमी अंतरावर आहे
दरवर्षी चैत्र वद्य एकादशीला तीन दिवस जत्रा भरत असते. मंदिर आणि परिसर फुलांनी छान सुशोभित केला जातो
पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या गावाचे लोक दिंडी घेऊन येत असतात. गावकऱ्यांच्या वतीने येथे भंडारा आयोजन असते.
अभिषेक, आरती, हरिपाठ , भजन, जागर, किर्तन, भारुड इ. धार्मिक कार्यक्रम होतात.तिसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून जत्रेची सांगता होते
आधीचे मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे . आतील गाभारा मध्ये रेडा समाधी आहे, विठ्ठल रुक्मिणी माता यांची मूर्ती आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे
0 टिप्पण्या