वज्रासन
वज्रासन हे एक अत्यंत उपयुक्त आणि सोपे योगासन आहे. “वज्र” म्हणजे वज्रासारखी (कठीण/बळकट) अवस्था. हे एकमेव आसन आहे जे अन्न खाल्ल्यानंतरही करता येते.
वज्रासनाचे प्रमुख फायदे:
जेवणानंतर हे आसन केल्यास अन्न लवकर पचते.
अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची तक्रार कमी होते.
शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
पोटाच्या आसपासचे स्नायू मजबूत होतात.
वजन कमी करण्यास मदत होते (विशेषतः पोटावरील चरबी कमी होते).
मन शांत होते, चिंताग्रस्तता कमी होते.
ध्यान आणि प्राणायामासाठी उपयुक्त आसन.
गुडघ्यांचे स्नायू बळकट होतात.
संधिवात, मांड्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
पायाकडून रक्तप्रवाह पोटाकडे येतो, ज्यामुळे पचनसंस्थेला ऊर्जा मिळते.
महिलांसाठी उपयुक्त मासिक पाळीतील वेदना कमी होतात.
गर्भाशयाचे कार्य सुधारते.
महत्वाची टीप:
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावे
गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये.
घुटण्याला किंवा पाठीला दुखापत झालेली असल्यास टाळावे.
कोणताही वैद्यकीय त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
0 टिप्पण्या