Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

अष्टविनायक थेऊर (श्री चिंतामणी) Ashtavinayak Theur-Theoor Sri Chintamani)


अष्टविनायक थेऊर (श्री चिंतामणी)



मुळा मुठा नदीच्या काठावर पुण्यापासून २५ की.मी. अंतरावर थेऊर हे अष्टविनायकापैकी  एक आहे. श्री गणेशाची आराधना करून ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर झाले ते  स्थान    म्हणजे "स्थावर क्षेत्र " किंवा थेऊर हे स्थान. श्री गणेशाची आराधना करून ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर झाले ते  स्थान    म्हणजे "स्थावर क्षेत्र " किंवा थेऊर हे स्थान.

मूर्तीचे तोंड पूर्वाभिमुख असून आसन घातलेली आहे . डोळ्यात माणिक रत्न आहे.लोभस रूप असलेली चिंतामनीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे .  तसेच  मागे चांदीची  महिरप आहे.

श्री मोरया गोसावींनी थेऊर येथील अरण्यात तपश्चर्या केली , व त्यांना सिद्धी प्राप्त झाली. नंतर मोरया गोसावींच्या कुळातील चिंतामणी देव यांनी हे मंदिर बांधले. नंतर माधवराव पेशवे यांनी मंदिरात लाकडी सभामंडप उभारला. तसेच आवारात एक मोठी घंटा आहे.

अत्याचारी राजा गणासुराचा वध केल्यानंतर कपिलमुनींनी विनायकाला चिंतामणी रत्न अर्पण केले . ते गळ्यात धारण करणारा तो "चिंतामणी विनायक " नावाने प्रसिद्ध झाला .
थोरले माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांची चिंतामणीवर अपार श्रद्धा होती. येथेच त्यांचे देहावसान झाले ,त्यांच्या पत्नी येथेच सती गेल्या . मुळा - मुठा नदीच्या काठावर त्यांचे  सतीचे वृंदावन आहे.

कसे जाल:- पुणे - सोलापूर रस्त्यावर , लोणी काळभोर गावापुठे डावीकडे कि.मी. वरती थेऊर येथे जाता येते. पुण्यापासून २२ कि. मी. अंतर आहे. स्वारगेट वरून पी.एम.पी. च्या बसेस मिळतात. तसेच हडपसर वरून खाजगी वाहने मिळतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या