अष्टविनायक लेण्याद्री (श्री गिरिजात्मज ):-
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात डोंगरावर हे स्थान आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे. लेण्याद्री जुन्नरपासून ८ कि.मी. आहे. मंदिर डोंगरावर लेण्यांप्रमाणे कोरून काढलेले आहे. लांबून ते एखाद्या छोट्या गुहेप्रमाणे भासते. सभामंडपात कोरीव काम असलेले सहा दगडी खांब आहेत. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला मारुती,शंकर या देवता आहेत. मूर्ती दगडी भिंतीवर कोरलेली आहे.
कुकडी नदीच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेले आहे. मंदिर हे एकाच दगडात कोरलेले आहे. मंदिराला ३०७ पायऱ्या आहेत. असे मानले जाते कि देवी पार्वतीने महागणपतीसारखा पुत्र व्हावा म्हणून महागणपतीचे घोर तप केले. त्यासाठी तिने स्वतःच्या मळापासून एक मूर्ती तयार केली व तिची पूजा केली. नंतर महागणपतीने पार्वतीस वर दिला कि, तुला माज्यासारखाच पुत्र होईल. गिरीजा म्हणजे पार्वती व आत्मज म्हणजे पार्वतीचा पुत्र.
विशेष म्हणजे श्री गणेशाचे हे एकमेव मंदिर आहे जे लेणीस्वरूपात आहे. या लेण्यांना गणेशलेणीही संबोधले जाते. इथे एकूण १८ लेण्या आहेत आणि गणपतीचा गाभारा ८ व्या लेणीमध्ये आहे.
कसे जाल :- पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरपासून ८ की.मी. लेण्याद्री आहे. पुणे ते लेण्याद्री हे अंतर १०० कि.मी आहे. तसेच मुंबई ते लेण्याद्री हे अंतर १७०कि.मी. इतके आहे. दोन्हीकडून एसटी बस ची सोय आहे.

0 टिप्पण्या