अष्टविनायक महड (श्री वरदविनायक):-
रायगड
जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड येथे अष्टविनायकातील एक वरदविनायक गणपती आहे.
प्रथम मंदिर कौलारू होते. त्यानंतर
१७३० ला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. समोर
तळे आहे, त्याचे नाव देवाचे तळे असे आहे. मूर्ती
पूर्वाभिमुख, बैठी असून डाव्या सोंडेची आहे. दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धी आहेत.
मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले
असते. येथे तीन वेळ पूजा चालते दुपारी बारा वाजेपर्यंत भक्तांना स्वतः पूजा अभिषेक
करता येते. नक्षीदार सिंहासन
आहे. मंदिरातील नंदादीप
१८९२ पासून अखंडित तेवत आहे असे सांगतात
ह्यामागील
कथा अशी कि,पूर्वी भद्रक राज्यात भीम नावाचा राजा राज्य करीत होता. पुढे त्याला नवसाने
रुक्मांगद नावाचा पुत्र झाला. तो दिसायला राजबिंडा होता. एकदा तो शिकारीला गेला असताना
वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे ऋषीपत्नी मुकुंद त्याच्या प्रेमात पडते. परंतु
रुक्मांगद त्यास नकार देऊन तेथून निघून जातो.
हे
सर्व इंदराला हे समजते, तेव्हा तो रुक्मांगदाचे रूप घेऊन मुकुंदाची इच्छा पूर्ण करतो.
नंतर तिला पुत्र होतो. तो म्हणजे
गुत्समदऋषी. पुढे त्याला समजते कि आपण ऋषीपत्नी मुकुंद आणि इंद्रदेव यांचा मुलगा आहोत
त्यामुळे गुत्समदऋषी आपल्या मातेला संतप्त होऊन शाप देतात कि तू काटेरी झाड होशील. (महड
येथे आपण जे बाभळीचे झाड पाहतो ते हेच)
मातेला शाप दिल्यामुळे गुत्समदऋषीना पाप लागते. या
पापक्षालनासाठी ते त्याच ठिकाणी श्री गणेशाचे घोर तप करतात. तपश्र्येमुळे श्री गणेश
प्रसन्न होतात व हवा तो वर माग असे म्हणतात. तेव्हा मानवजातीच्या कल्याणासाठी तू इथेच
राहा असे ते म्हणतात. त्यावर श्री गणेशाने तथास्तु म्हटले. आणि तेव्हापासून या गणेशाचे
नाव "वरदविनायक"(वर देणारा विनायक) असे पडले.
कसे जाल :- पुणे मुंबई रस्त्याने खोपोली एसटी स्थानकाच्या अलीकडे
महड फाटा आहे. तेथून २ कि.मी. महड आहे. पुणे ते महड अंतर ८४ कि.मी. आहे. मुंबई ते
महड अंतर ८२ कि.मी. आहे.

0 टिप्पण्या