अष्टविनायक मोरगाव (श्री मयुरेश्वर):-
अष्टविनायकांपैकी
हा मनाचा पहिला गणपती. येथूनच अष्टविनायक यात्रा सुरु करण्याची प्रथा आहे.
गाणपत्य
संप्रदायाचे हे आद्यपीठ मानले
जाते. ब्राह्मा,विष्णू,महेश ,शक्ती,आणि सूर्य या पाच देवतांनी
येथे तप केले. तेव्हा
आदिशक्तीस्वरूप श्री गणपतीने त्यांना दर्शन दिले.
नंतर या पंच देवतांनी
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाची येथे स्थापना केली. पूर्वीपासून याठिकाणी मोर जास्त असल्यामुळे या गावाचे नाव
मोरगाव पडले असावे. मोरगाव कऱ्हा नदीच्या किनारी वसले आहे. बारामती तालुक्यामध्ये मोरगाव आहे.
आणखी
एक कथा अशी कि,मोरावर बसून
श्री गणेशाने सिंधू दैत्याचा वध केला,म्हणून
मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे नाव पडले.
श्री मोरया गोसावींचे हे जन्मस्थान आहे.
पश्चिमेच्या बाजूला वृक्षाखाली बसून श्री मोरया गोसावींनी तपश्चर्या केली होती. मयूरेश्वराची
मूर्ती फार आकर्षक आहे. मूर्ती डाव्या सोंडेची ,पूर्वाभिमुख आहे. व त्रिनेत्री असून
डोळ्यात व बेंबीत हिरे
बसवलेले आहेत. मंदिराभोवती पन्नास फूट उंचीची संरक्षक
तटबंदी आहे.
मयूरेश्वराच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मस्तकावर नागराजाच्या फणा आहे. आणि पुढे मूषक व मोर आहेत.
विशेष म्हणजे महाद्वारासमोर गणपतीकडे तोंड करून काळ्या पाषाणाचा नंदी आहे. गाभारा आणि प्रशस्थ सभामंडप आहेत. मयूरेश्वराची दररोज तीन वेळा पूजा केली जाते.
कसे जाल :-
पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ६४ कि.मी. अंतरावर मोरगाव आहे. पुणे - स्वारगेट एसटी बस आहेत.

0 टिप्पण्या