Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

अष्टविनायक ओझर (श्री विघ्नेश्वर) Ozar (Ashtavinayak Ozar, Shri Vighneshwar)


अष्टविनायक ओझर (श्री विघ्नेश्वर):-


पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, कुकडी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले ओझर हे विघ्नेश्वराचे ठिकाण. हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे.
हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सत्ता आणि संपत्ती याचा खूप लोभ होता. एकदा त्याला आपण इंद्रपद मिळवावे असे वाटले. त्यासाठी त्याने यज्ञ सुरु केला. यज्ञात इंद्रदेव सोडून सर्व देवी - देवतांसाठी आहुती दिली जाणार होती. नारदमुनींना हे समजताच ते इंद्राकडे गेले,नारदांनी अभिनंदन राजाच्या यज्ञाची तो इंद्राचा योग्य तो सन्मान करत नसल्याची हकीकत सांगितली.
हे एकताच इंद्रदेव संतापले, रागाने लालबुंद झाले. त्यांनी काळाचे स्मरण केले. आणि इंद्रदेवाच्या सांगण्यावरून काळाने तात्काळ विघ्नासुराचा अवतार धारण केला आणि पृथ्वीवर येऊन सर्व वैदिक कार्याचा नाश करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी सर्व देव श्री गजाननाला शरण गेले. श्री गजाननाने देवांना अभय दिले. त्यानंतर श्री गणपतीने पाश्वपुत्राच्या रूपात विघ्नासुराशी घमासान युद्ध केले,शेवटी विघ्नासूर गणपतीला शरण आला.
तेव्हा गणपती बोलले कि,मी तुला जीवनदान देतो परंतु , जेथे भक्त माझी पूजा अर्चा , स्मरण करत असतील त्याठिकाणी तू असता काम नये. विघ्नासुराने सर्व कबूल केले आणि एक विनंती केली कि, गजानना तुझ्या नावासोबत माझे नाव असावे , अशी माझी इच्छा आहे. त्यावर श्री गणपतीने तथास्तु म्हटले. अशाप्रकारे श्री गणपतीचे नाव "विघ्नेश्वर" पडले. ज्याठिकाणीहे घडले ते स्थान म्हणजे ओझर.
इथे भाद्रपद शुद्ध चतुर्थी तसेच मग शुद्ध चतुर्थी या दोन दिवशी दरवर्षी उत्सव साजरा करतात. त्रिपुरी पौणिमेपासून पुढे चार दिवस दीपोत्सव साजरा करतात. चिमाजी अप्पा पेशव्यांनी या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला आहे. मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. तसेच चारही बाजूना भक्कम तटबंदी आहे. तटबंदीवर पायवाट असून तेथून शिवनेरी किल्ला आणि लेण्याद्री हे ठिकाण दिसते.
तीन सभामंडप आहेत. तिसऱ्या सभामंडपात विघ्नेश्वराची पूर्णाकृती मूर्ती आहे. मूर्ती बैठी आणि डाव्या सोंडेची आहे. डोळ्यात माणिक आहेत, तसेच मस्तकावर हिरा बसवलेला आहे. दोन्ही बाजूस रिद्धी - सिद्धी आहेत

कसे जाल :- पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव येथून जुन्नरच्या आधी ओझर फाटा लागतो. तेथून ओझर ५ कि.मी. आहे. एसटी बसची सोय मंदिरापर्यंत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या