Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

अष्टविनायक रांजणगाव (श्री महागणपती) Ashtavinayak Ranjangaon, Shri Mahaganpati


अष्टविनायक रांजणगाव (श्री महागणपती):-

             त्रिपुरासूर खूप उन्मत्त झाला व देवलोक तसेच पृथ्वी वर तो सर्वाना त्रास देऊ लागला. तेव्हा सर्व देव आणि इंद्र कैलास पर्वतावर श्री शंकर भगवानाकडे गेले. व त्यांना त्रिपुरासुराचा वध करण्याची विनंती केली. मग भगवान  शंकरानी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी आधी श्री गणेशाचे जेथे ध्यान केले. तेच हे ठिकाण म्हणजे रांजणगाव. नंतर भगवान शंकरानी त्रिपुरासुराचा नाश केला ,  त्या दिवशी पौर्णिमा होती म्हणून तेव्हापासून त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. नंतर भगवान शिवशंकरांनी तेथे श्री महागणपतीची स्थापना केली. 
            या गावाचे नाव पूर्वी मणिपूर होते असे मानले जाते. तेथून मंदिर जवळच आहे. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य तसेच प्रेक्षणीय आहे. 
             महागणपती म्हणजे शक्तिशाली गणपती. डाव्या सोंडेची आसन घातलेली महागणपती ची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. दोन्ही बाजूना रिद्धी सिद्धी आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. दक्षिणायन आणि उत्तरायणात सूर्याची किरणे श्री महागणपतीवर पडतात.गाभाऱ्याच्या खाली तळघर आहे, तेथे अजून एक गजाननाची मूर्ती असून ती मूळ मूर्ती असल्याचे सांगितले जाते त्या मूर्तीला वीस हात व दहा सोंड आहेत.

कसे जाल :- स्वारगेट वरून एसटी बस ची सोय आहे. अहमदनगर गाडीने रांजणगावला उतरता येते. पुणे अहमदनगर महामार्गावर शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर रस्त्याला लागूनच  रांजणगाव आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या