अष्टविनायक सिद्धटेक (श्रीसिद्धिविनायक):-
हे स्थान अहमदनगर
जिल्ह्यात भीमा
नदी किनारी , छोट्याशा टेकडीवर आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती तीन
फूट असून , स्वयंभू आहे. सिद्धटेक हा कार्य सिद्धीस नेणारा म्हणून सिद्धिविनायक आणि अष्टविनायकापैकी एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे. मंदिराचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे, त्यानंतर महाद्वार व नगारखाना आहे. मखर पितळेचे असून सिंहासन दगडाचे आहे. मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत.
मधू आणि कैतभ या दोन दैत्यांनी सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली . सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी त्यांना श्री विष्णूकडे जाण्यास सांगितले, त्यानुसार सर्व देव विष्णू कडे गेले. विष्णू या दैत्यांशी बराच काळापर्यंत लढले परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा सगळे देवलोक चिंतेत पडले,
मग भगवान शंकरानी श्री विष्णूंना श्री गणेशाची आराधना करण्यासाठी एक मंत्र दिला. त्यानंतर
श्री विष्णू एका टेकडीवर गेले व त्या मंत्राचा जप केल्यामुळे श्री गणेश श्री विष्णूवर प्रसन्न झालेअशाप्रकारे श्री विष्णूंना जेथे सिद्धी भेटली तेथे त्यांनी एक मंदिर बांधले.
त्यात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. विष्णूंना या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून श्री
गणेशाचे नाव "श्री सिद्धिविनायक" आणि या क्षेत्राचे नाव सिद्धक्षेत्र किंवा
सिद्धटेक हे असे पडले. त्यानंतर श्रीविष्णुंनी मधू आणि कैतभ या दोन दैत्यांचा वध केला.
मोरया गोसावी (चिंचवड) आणि नारायण महाराज (केडगाव) यांना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. इथे भाद्रपद
शुद्ध चतुर्थी तसेच मग शुद्ध चतुर्थी
या दिवसा पासून पाच दिवस दरवर्षी उत्सव साजरा करतात. उजव्या सोंडेचा गजानन असल्यामुळे तो कडक असल्याचे
मानतात. मंदिराच्या जवळच भीमा नदी वाहते. राहण्यासाठी धर्मशाळाही आहे.
कसे जाल:- पुण्याहून रेल्वेने दौंडला जाऊन तेथून
भीमा नदी पार करून सिद्धटेक १३ कि.मी.आहे.

0 टिप्पण्या