अष्टविनायक पाली (श्री बल्लाळेश्वर):-
रायगड
जिल्ह्यात सुधागड तालुक्यात नागोठणे गावाजवळ पाली गाव आहे. पालीमध्ये प्रवेश केल्यावर प्रथम लागते बल्लाळेश्वर मंदिर.
पौराणिक कथा
अशी आहे कि,कृतयुगामध्ये या
ठिकाणी पल्लीपूर नावाचे गाव होते. येथील कल्याण नावाच्या व्यापाऱ्यास बल्लाळ नावाचा पुत्र होता.तो लहानपणापासून गणेश
चिंतन व ध्यानधारणा करत
असे. आपल्या मित्रांनाही तेच करायला लावीत असे. कल्याण शेटजींना हे पसंत नव्हते.
त्यांनी बल्लाळ कडून गणपती मूर्ती काढून घेतली आणि त्याला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळाने घरी जाणार नाही, येथेच देह अर्पण करेन असा निश्चय केला व श्री गजाननाचे
स्मरण केले , तप केले. त्याचा
भक्तिभाव पाहून गणपतीने प्रकट होऊन वर दिला. भक्त
बल्लाळ च्या नावावरून गणेशाचे नाव बल्लाळेश्वर पडले. त्यानंतर हि भूमी गणेशक्षेत्र
आणि जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध झाले.
पेशवेकाळात
या देवस्थानाला कौंल लावून न्यायनिवाडा केला जाई. या मंदिरासमोर दोन
तळी आहेत. त्यातील पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. मंदिर श्रीकारी धाटणीचे असून दोन गाभारे आहेत. मंदिराचे बांधकाम चिरेबंदी आहे. श्री बल्लाळेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, तीन फूट उंच असून डाव्या सोंडेची, दगडी सिंहासनावर आरूढ आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. मागील बाजूस रिद्धी सिद्धी आहेत. देऊळ फार रमणीय आहे. मोदक हातात घेऊन श्रीगणेशकडे पाहत उंदीर उभा आहे.या मंदिराचे वैशिष्टया म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची उगवती किरणे मूर्तीवर पडतात.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना मी पूर्ण करेल.भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवस मोठा उत्सव असतो. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी तसेच दरमहा विनायकी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी पालखी निघते.
कसे जाल:-मुंबई वरून एस. टी. ची सोय आहे. पुणे ते पाली अंतर १११ कि.मी. आहे. खासगी वाहनाने पनवेल वरून जात येते.
0 टिप्पण्या