गणेश चतुर्थी - गणेश जन्म कथा
photo credits harshad lad
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते.
शिवपुराणात गणेशजन्म आणि चतुर्थीव्रताची कथा येते. ही कथा आपल्याला परिचित आहे. पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण लक्ष ठेवण्याकरता कोणी नव्हते. तेव्हा देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि एका अलौकिक बालकाची निर्मिती केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीदेवी स्नानासाठी गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. तोच त्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतापले आणि त्यांनी त्याऱ्चं शिर धडावेगळं केलं.
पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. तेव्हा भगवान शंकर आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते हत्तीचे डोके बालकाच्या धडावर लावले.आणि त्याला जिवंत केले. आणि आपला पुत्र मानून गणेश नावे देऊन शिवगणांचा अधिपती केले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला होणारी गणेश पूजा पंधरवडय़ात घडलेल्या पापांचे परिमार्जन करते आणि शुभ फळ देते.
एकदा श्रीगणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा उपहासाने त्याला चंद्र हासला. तें पाहून श्रीगणपतीला चंद्राचा राग आला. गणपतीने त्याला शाप दिला की , आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही, आणि जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!" शेवटी चंद्राने तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले.
पण वर्षातून एक दिवश भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल असे सांगितले. खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.
एकदा कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री भरद्वाजऋषींकडून पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय पुत्र जन्माला आला, तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हा दिवस होता, मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी चा.
स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला.यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारक ह्या नांवाने ओळखली जाऊन उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. तेंव्हापासून अंगारक चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी केल्याची फळप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल अंगारकी चतुर्थी आणि दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या कार्यात यश प्राप्त होते.
प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला होणारी गणेश पूजा पंधरवडय़ात घडलेल्या पापांचे परिमार्जन करते आणि शुभ फळ देते.

0 टिप्पण्या