Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

गौरी आगमन कथा


गौरी आगमन कथा

                 
pic by Sarika Shinde, Parvati, Pune

            महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध सप्तमी यादिवशी  गौरी आणण्याची प्रथा आहे. मराठवाड्यात त्यांना महालक्ष्मी असे संबोधतात. काही घराण्यात तेरड्याच्या फुलाची किंवा खड्यांच्या गौरी असतात , काहींकडे दोन तसेच काहींकडे एक गौरी बसवण्याची प्रथा असते. एक गौरी ज्येष्ठा तर दुसरी कनिष्ठा म्हणतात.


     गौरी यायच्या आधी घरामध्ये स्वछता करतात , रंगबेरंगी आरास करतात.आठ ते दहा दिवस आधीच सर्व तयारी केली जाते.बाजारातून  नवनवीन गौरीचे मुखवटे , दागदागिने  आणले जातात   


पहिला दिवस - गौरी आवाहन
            गौरी आणावयाच्या दिवशी दारापासून मागील ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी "गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली" असे म्हणत गौरी आणतात.घरातील किंवा गावातील पाच सुवासिनी गौरींना हळद कुंकू लावून त्यांचे स्वागत करतात.पायावर पाणी घालून तिला घरात घेतात.
         पहिल्या दिवशी मेथीची भाजी आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून करतात. गौरी या माहेरवाशीण असतात ,म्हणजेच माहेरी येतात त्यामुळे त्यांना आगमन झाल्यानंतर बसवले जाते.गौरीला साडी नेसवली जाते नंतर तिला वेगवेगळे दागिने घालून सजवले जाते. गौरीपुढे ओटी ठेवतात. खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात.गौरीपुढे  बाळ ठेवतात कारण ती लेकुरवाळी असते. 

दुसरा  दिवस - गौरी पूजन  
            दुसऱ्या दिवशी गौरीपूजन किंवा गौरीजेवण असते तो दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमीचा असतो. गौरीसाठी पंचपक्वानाचे जेवण बनवतात त्यात पुरणपोळी , खीर , श्रीखंड, पंचामृत आणि लाडू ,कारंजी, शंकरपाळी, चिवडा ,चकल्या ,तसेच सर्व प्रकारचे व्यंजन तयार केले जातात. आता काळाप्रमाणे पावभाजी , इडली , डोसे हे आणि अशाच प्रकारचे पदार्थही काही ठिकाणी ठेवले जातात.  नैवेद्य केळीच्या पानावर ठेवला जातो.
             संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. महिलांना पानसुपारी , खडीसाखर तसेच यथाशक्ती आदरसत्कार करण्याची प्रथा आहे. रात्री गौरी जागवल्या जातात .विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आणि गाणी म्हटली जातात.  कोकणात सुवासिनी ओवसा मागतात. 

तिसरा  दिवस - गौरी विसर्जन 
            तिस-या दिवशी दही-भाताचा नैवेद्य प्रामुख्याने केला जातो. . संध्याकाळी चार वाजल्यानंतर  गौरींवर अक्षता टाकून गौरी विसर्जन करतात. गौरी आपल्या घरी जायला निघतात. रात्री एका ताटामध्ये कुंकू व हळद ठेवली जाते. असे म्हणतात कि गौरी स्वतः हळद कुंकू लावून आपल्या सासरी जाते. 

असे म्हणतात कि पहिल्या दिवशी गौरी प्रवासामुळे दमलेली दिसते, दुसऱ्या दिवशी हसरी प्रसन्न दिसते आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी उदासीन दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या