Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shree Krishna Janmastami)

श्रीकृष्ण जन्माष्टमी



                       कृष्णा जन्माष्टमीला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणतात. हा एक भारतातील महत्वाचा उत्सव आहे. हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन आहे. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे पृथ्वीवरील आठवे अवतार आहेत.श्रावण महिनात कृष्ण पक्षात कृष्णाचा जन्म कारागृहात झाला. 
 
                द्वापारयुगातील  ही एक कथा आहे. तेव्हाच्या काळात कंस हा मथुरेचा एक भयंकर आणि कपटी शासक असतो. कंसाने आपल्या वडिलांना उग्रसेन राजाला कारागृहात टाकले ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी. कारण उग्रसेन राजाला कंस हा एकच पुत्र होता. परंतु, कंस कपटी असल्यामुळे उग्रसेन राजाला मथुरेचे राज्य त्याच्या स्वाधीन करावयाचे नव्हते. हे सर्व कंसाला समजल्यावर त्याने स्वतःच्याच वडिलांना कारागृहामध्ये ठेवले. त्याला एक बहीण देवकी होती आणि ती त्याची अत्यन्त लाडकी होती. 

              कालांतराने देवकी आणि मथुरेचा सेनापती वासुदेव यांचे लग्न होते. तिची पाठवणीच्या वेळेस आकाशवाणी होते कि,"देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ बनेल" त्यावेळी  कंस त्या दोघांना (वासुदेव आणि देवकी) तुरुंगात ठेवतो . 

          नंतर देवकी पहिल्यांदा गर्भवती होते हे कंसाला समजल्यावर तो तेथे पहारेकरी नेमतो आणि त्यांना सांगतो कि, जसेच बाळाचा जन्म होईल तसेच त्याला सूचित करण्यात यावे. जसेच देवकीच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला कंस तेथे आला आणि त्याने त्या बाळाला कारागृहातील एका दगडावर आपटून ठार मारले.असे करत करत देवकीचे सात पुत्र मारले गेले. वासुदेव आणि देवकी यांना खूप दुःख होत होते . 

            आता देवकी आठव्यांदा गर्भवती झाली, आणि ती वासुदेवाला बोलली कि, "काहीही होऊदेत आता यावेळेस काही शक्कल लढवून बाळाला वाचवले पाहिजे दोघेही देवाकडे अशीच प्रार्थना करतात. 

आणि एका मध्यरात्री देवकी एका सुंदर बाळाला जन्म देते.वासुदेव बोलतो कि, मी बाळाला माझा गोकुळ गावातील मित्र नंद यांच्याकडे सोडून येतो. देवकी बोलते कि, परंतु कसे बाहेर पाऊस आहे आणि पहारेकरी आहेत. कृष्ण जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेवाच्या कारागृहाबाहेरील सेवक गाढ झोपेत होते, असे बोलताच चमत्कार व्हावा त्याप्रमाणे कारागृहाची कुलपे उघडून खाली निखळली.देवकीने एक टोपली घेतली त्यात एक कापड ठेऊन बाळाला त्यात ठेवले आणि वासुदेवाकडे सोपवले. 

          वासुदेव यमुना नदीच्या काठावर गेले पाहतात ते काय यमुना नदी दुथडी भरून वाहत आहे. 
त्यावेळी यमुनेला पूर आला होता.स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता वासुदेव नदीपात्रात चालू लागला.आणि जसच श्रीकृष्णाचे पायाचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला झाला तसेच पूर ओसरू लागला. वरून पाऊस चालूच होता तेव्हा शेषनाग जे श्रीविष्णूची शय्या आहेत ते प्रगट झाले आणि कृष्णाचे रक्षण केले. 

             जेव्हा कृष्ण नंदाच्या घरी पोहोचला तेव्हा, त्याची पत्नी यशोदा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आणि ती गाढ झोपेत होती. हळूच वासुदेवाने त्या मुलीला उचलून कृष्णाला त्या जागी ठेवले. नंदाला संपुर्ण हकीकत सांगून, वासुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहात परत आला. इकडे आल्यानंतर वासुदेव कारागृहात येऊन त्याने स्वतःच्या हातातील मुलीला देवकीच्या मांडीवर दिले. त्याबरोबर कारागृहाचे दरवाजे बंद झाले आणि पहारेकरी उठून बसले. त्यांना समजले कि देवकीने एका मुलीला जन्म दिला आहे. पहारेकर्यांनी हि वार्ता कंसाला दिली त्यासरशी कंस कारागृहात आला.  

                देवकी आणि वासुदेवाला वाटले कि, कंस त्या मुलीला सोडून देईल कारण आकाशवाणी मध्ये देवकीचा आठवा पुत्र अशी घोषणा झाली होती. परंतु कंसाला दया आली नाही त्याने त्या मुलीला देवकी वासुदेवाकडून हिसकावून घेतले आणि दगडावर तिचे डोके आपटले. तितक्यात चमत्कार झाला, त्या मुलीच्या जागी देवीशक्ती अवतरली आणि तिने कंसाला सांगितले की देवकीचा आठवा पुत्र जिवंत असून लवकरच तो मोठा झाल्यावर तुझा नाश करेल,आणि तुझ्या जाचातून सर्वाना मुक्त करेल. 

               नंतर कृष्ण सोळा वर्षांचा झाल्यावर त्याने कंसाचा वध केला. आणि अशाप्रकारे वासुदेव - देवकीच्या लग्नाच्या वेळी झालेली आकाशवाणी खरी ठरली. 

                कृष्णा थोडा मोठा झाल्यावर त्याला लोणी खायला फार आवडत असे. त्यामुळे तो आणि त्याचे सवंगडी सारे मिळून गोकुळातील गोपीच्या घरी जाऊन लोणी खात असत. हि गोष्ट गोपीना समजल्यामुळे त्या त्यांचे घरातील लोणी शिक्याला बांधून ठेवत असत. मग श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी एकावर एक थर लावून सर्वात वरती कृष्ण चढत असे आणि शिक्यावर मडक्यात ठेवलेले लोणी किंवा दही चोरून खात असत. 

             श्रीकृष्ण स्वतः देव होते आणि त्यांच्या म्हणजेच नंद - यशोदेच्या घरी दही आणि लोण्याची काहीच कमतरता नव्हती तरी तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ते चोरून दही का खात होते त्याचे कारण कि, गोकुळातील आणि पंचक्रोशीतील गावे सर्व कंसाच्या अधिपत्याखाली होती आणि कंसाचा आदेश होता कि, सर्व गावातील दूध, दही,लोणी इत्यादी दुधाचे पदार्थ राजमहालात मथुरेला आणून द्यावेत आणि त्याला घाबरून सर्व गावकरी आपापल्या घरातील दूध, दही,लोणी हे पदार्थ स्वतःच्या मुलांना न देता मथुरेला घेऊन जात असत.त्यामुळे येथील मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला ताकत मिळत नव्हती त्यांच्याकडे गाई मुबलक प्रमानात असूनही ती मुले त्यापासून वंचित राहू नये म्हणून  श्रीकृष्ण त्याआधीच ती मडकी घेऊन मुलांना खायला देत असे. आणि त्याचप्रमाणे आपण कोणाही अन्याय करणाऱ्यांविरुद्ध उभे राहावे.अशी कृष्णाने शिकवण दिली  

               तेव्हापासून कृष्णजन्म हा संपूर्ण भारतात साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात. पाळणा सजवला जातो. गाणी म्हटली जातात. रात्री १२ वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून बारसे केले जाते, मिठाई वाटली जाते. आणि दुसऱ्या दिवसाला गोपाळकाला म्हणतात त्याचा प्रसाद खाऊन उपवास सोडतात.  

               महाराष्ट्रामध्ये कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. त्यालाच गोपाळकाला असे म्हणतात. मडक्यात दही बांधून एका दोरीला लटकावून सजवले जाते आणि उंचावर ते बांधले जाते नंतर श्रीकृष्णाप्रमाणेच एकावर एक थर लावून हंडी फोडली जाते. यासाठी एकप्रकारे स्पर्धा लागलेली असते त्यांना बक्षीस म्हणून पैसे आणि ट्रॉफी ठेवलेली असते. मोठमोठे कलाकार येथे उपस्थित असतात. मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात.      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या