उकडीचे मोदक रेसिपी
महाराष्ट्रीयन रेसिपी
कोर्स:
पाककृती: महाराष्ट्र
तयारीची वेळ: ३० मिनिटे
कूक वेळ: १५ मिनिटे
एकूण वेळः ४५ मिनिट
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य: -
1. १ कप गूळ
2. १ नारळ
3. १ कप तांदूळ पिठी
4. १/४ टीस्पून मीठ
5. १ चमचा विलायची पूड
6. 4 चमचे साजूक तूप
7. १ १/२ कप पाणी
8. दोन चमचे तेल
कृती :-
प्रथम नारळ फोडून विळीवर खोऊन घ्यावा .
गूळ चिरून किंवा खिसुन घ्यावा.
कढई मध्ये नारळाचा चव ओतून मंद आचेवर परतून घ्यावे.
नंतर त्यात गुळ टाकावा आणि व्यवस्थित परतून घ्यावे
मिश्रण सुके होईपर्यंत परतावे
त्यात विलायची पूड टाकावी.
मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवावे . आपले सारण तयार आहे.
आता दुसरी कढई गॅसवर ठेऊन त्यात पाणी गरम करण्यास ठेवावे .
त्यात दोन चमचे तेल आणि १/४ चमचा मीठ टाकावे.
पाणी उकळू लागल्यावर गॅस बारीक करून त्यात तांदुळाची पिठी टाकावी.
व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. मग २ मिनिटे झाकण ठेवावे.
२ मिनिटांनी गॅस बंद करावा व मिश्रण झाकून ठेवावे .
एका ताटात हे पीठ ओतून चांगले मळून घ्यावे.
हाताला तेल किंवा तूप लावून पिठाचा छोटा गोळा करून घ्यावा.
त्या गोळीची वाटीच्या आकाराची पारी बनवावी किंवा दोन प्लॅस्टिकच्या मध्ये ठेऊन पोळपाटावर लाटण्याने लाटून घ्यावे.
पारी हातात घेऊन विषम संख्येत म्हणजे पाच, सात, नऊ अशा चुण्या करून घ्याव्या त्यात सारण भरावे .
आणि हळुवार हाताने बोटांच्या साहाय्याने पारी मिटून घ्यावी .
अशाप्रकारे सर्व मोदक करून घ्यावे
एका पातेल्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवावे त्यावर चाळणी ठेवावे . चाळणीमध्ये रुमाल ठेवून त्यात मोदक ठेवावे त्यावर झाकण ठेवावे आणि ५ ते ७ मिनिटे मोठ्या आचेवर उकडावे.
मोदक तयार आहेत.
महत्वाची टीप: -
तांदळाचे पिठाचे मिश्रण फार गार होऊ देऊ नये.
बासमती तांदूळ धुवून सावलीत वळून दळून आणलेल्या तांदळाचे पीठ वापरावे.
अधिक माहितीसाठी विडिओ पाहावा.

0 टिप्पण्या