Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

मलाई बर्फी रेसिपी ( Malai Barfi Recipe )

 मलाई बर्फी रेसिपी 

कोर्स: गोड 

पाककृती: भारतीय 

 तयारीची वेळ: १० मिनिटे

 कूक वेळ: ५ मिनिटे

 एकूण वेळः १५ मिनिट

 सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज


साहित्य: -

1. १ लिटर दूध 

2. एक लिंबू 

3. १ वाटी साखर 

4. १/२ वाटी रवा 

5. १ चमचा विलायची पूड 

6. 4 चमचे साजूक तूप 

7.      चिमूटभर केसर 

8.     ड्रायफ्रुटस आवडीनुसार 


कृती :-

प्रथम पाऊण लिटर दूध गरम करत ठेवावे.

दूध उकळू लागल्यावर त्यात लिंबू रस टाकावा आणि गॅस बंद करावा. 

एका पातेल्यावर चाळण ठेऊन त्यावर एक सुती कापड  ठेवावे त्यावर हे फाटलेले दूध ओतावे . पाणी चाळणीतून गेल्यावर बाकी राहिलेले कापडात बांधावे आणि चाळणीवर ठेऊन त्यावर जड वस्तू किंवा डबा ठेवावा 

दोन तासांनी पनीर तयार होईल 

एका कढईत रवा भाजून घ्यावा आणि एका ताटात काढून घ्यावा 

त्याच कढईत पाव लिटर दूध ओतून आटवून घ्यावे. दूध आटवताना सतत हलवत राहावे. नंतर त्यात साखर टाकावी 

साखर विरघळेपर्यंत एकजीव करावे.  

नंतर त्यात पनीर टाकावे आणि मंद आचेवर २ मिनिटे परतून घ्यावे. 

मग भाजलेला रवा आणि तूप टाकून व्यवस्थित परतून घ्यावे 

नंतर त्यात विलायची पूड टाकावी. मिश्रण सुके होईपर्यंत परतावे.  

एका पसरट ताटाला तूप लावावे त्यावर ड्रायफ्रुटस छोटे छोटे काप करून पसरवावे . त्यावर केसर पसरवावे. आणि कढईतील मिश्रण ओतून व्यवस्थित पसरवावे आणि  गार होण्यासाठी बाजूला ठेवावे . 

पाच मिनिटांनी आवडीच्या आकारात कापावे परत १० मिनिटे गार होण्यास ठेवावे . 

नंतर एक ताट घेईन त्यावर मिश्रण असलेले ताट पालटावे. म्हणजे ड्रायफ्रुटस वरच्या दिशेला येतील . 

मलाई बर्फी तयार आहे. 


महत्वाची टीप: -

साखर आणि ड्रायफ्रुटस आवडीप्रमाणे कमी - जास्त करावे. 

कृती करताना पदार्थ सतत हलवत  राहावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या