मसाला डोसा रेसिपी
कोर्स: ब्रेकफास्ट
पाककृती: भारतीय
तयारीची वेळ: १५ मिनिटे
कूक वेळ: १५ मिनिटे
एकूण वेळः ३० मिनिट
सर्व्हिंग्ज: ४ सर्व्हिंग्ज
साहित्य: -
- २ कप तांदूळ
- १ कप उडीद डाळ
- १ चमचा मीठ
- ३ मोठे बटाटे
- कोथिंबीर बारीक चिरून
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा जिरे
- १ चमचा मोहरी
- १ कांदा बारीक चिरून
- ६ हिरव्या मिरच्या
- १ वाटी तेल
- १/२ चमचा खाण्याचा सोडा
कृती :-
- तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळी ६ ते ८ तास भिजत ठेवावी
- नंतर दोन
पाण्याने
धुवून
वेगवेगळी
मिक्सर
वर
बारीक
वाटून
घ्यावी.
दोन्ही मोठ्या भांड्यात एकत्र करून त्यात खाण्याचा
सोडा टाकून एकजीव करून ६ तास झाकून ठेवावे.
- बटाटे उकडून घ्यावे . नंतर ते सोलून ते कुस्करून घ्यावे.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी , जिरे घालून तडतडू द्यावे
- मिरच्या चिरून घालाव्या. मग त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.
- मीठ आणि कोथिंबीर घालून परतावे आणि एकजीव करावे. गॅस बंद करावा.
- तांदूळ डाळीचे मिश्रण आता मस्त फुलले असेल. वर पाणी आले असेल तर ते काढून टाकावे.
- त्यात मीठ टाकावे. गरज वाटल्यास थोडे पाणी टाकावे आणि मिश्रण व्यवस्थित हलवावे .
- मोठ्या आचेवर तवा गरम करण्यास ठेवावा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे पाणी हाताने शिंपडावे . एक कांदा मधून कापून तो तेलात बुडवावा आणि तव्यावर सगळीकडे फिरवावा . आता त्यावर वाटलेले मिश्रण एका डावाने ओतावे आणि डावाच्या साहाय्याने ते गोलाकार पसरवावे. बाजूने थोडे तेल सोडावे. त्यावर थोडे लाल तिखट बोटाने पेरावे मग डोसा पलटवून व्यवस्थित भाजावा. कडक होऊ द्यावा आच मोठी ठेवावी. डोशाच्या मध्ये थोडी बटाटा भाजी ठेवावी. आणि एका ताटात काढावी.
- डोसा वाढताना सोबत खोबऱ्याची चटणी आणि सांभार सोबत द्यावे.
0 टिप्पण्या